Description
“तळपणारा परशु हातात धरणारे परशुराम, अमोघ धनुष्य धारण करणारे परशुराम, क्रोधाग्निमुळे ज्यांचे डोळ्यातून अग्नीच्या ठिणग्याच बाहेर पडत आहेत असे परशुराम, महापराक्रमी नृपवरांचे निर्दालन करणारे परशुराम, हेच चित्र आपल्या डोळ्यांसमोर येते. पण कार्य होताच दुसऱ्या क्षणाला जे शांत झालेले आहेत, जे प्रसन्न चेहेऱ्याचे आहेत, ब्रम्हतेजांचा जे नीधी आहेत, अशा परशुरामांच्या नित्य स्वरूपाकडे आपले लक्ष जात नाही. रेवा नदीच्याकाठी कामधेनूच्या विमुक्तीसाठी रणकंदन चालू असताना, सूर्योदय व सूर्यास्त समयी शस्त्र खाली ठेवून नित्योपासना करणारे परशुराम मानवी जीवनाचे आदर्श दैवत आहेत.”