Description
“श्री खरात यांना वाङ्मयाची खरीखुरी आवड असून मराठीचे ते आस्थेवाईक व अतिशय परिश्रमशील अभ्यासक आहेत असे मी नि:शंकपणे म्हणू शकतो.’
– श. मा. मुक्तिबोध
प्रकाश खरातांच्या कथादृष्टीत नाट्याची अभिज्ञता आहे, कल्पकता आहे, मनुष्यस्वभावाचे ज्ञान आहे आणि बऱ्याच प्रमाणातील शब्दसामर्थ्यही आहे; तथापी त्या सर्व गुणांना स्थूल
डॉ. रूपेश नरहरी कऱ्हाडे द्वंद्वांच्या खेळाबाहेर काढून जीविताच्या गाभ्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला असेही सामर्थ्य त्यांच्याजवळ आहे. ”
– रा. ग. जाधव
“प्रकाश खरात हे अत्यंत सजग असे प्रतिभावंत आणि प्रज्ञावंत आहेत. महाराष्ट्रातील अधिकाधिक टोकदार होत चाललेल्या विचारविश्वाशी असलेले आपले नाते त्यांनी सतत जिवंत ठेवले आहे. त्यांच्या वैचारिक आणि समीक्षापर लेखनातून ही बाब आपणास जाणवते.’
”
– डॉ. यशवंत मनोहर
“साहित्यसमीक्षा आणि समाजचिंतन या ग्रंथात डॉ. प्रकाश खरात यांच्या विविध वाङ्मयप्रकारांच्या लेखनाचा समीक्षाशोध घेतला आहे. त्यांच्या कथा, कविता, कादंबरी, समीक्षा, संशोधन इत्यादी विषयक अनेक अभ्यासकांनी मौलिक साहित्य-समाजचिंतन मांडले आहे. त्यामधून मराठी संस्कृतीची जीवनमूल्ये व वाङ्मयमूल्ये गतिमान झाली आहेत त्यामुळे हा गौरवसमीक्षाग्रंथ महत्त्वाचा ठरला असे मला वाटते.”
1
• डॉ. रूपेश नरहरी कऱ्हाडे
कायन